- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू खरिप हंगामात सोयाबिन बियाण्यांची पेरणी केल्यानंतर त्याची उगवणच झाली नसल्याच्या हजारो तक्रारी कृषी विभागाकडे झाल्यानंतर बियाणे उत्पादक कंपन्यांकडून त्याची भरपाईचा आदेश देण्यात आला. त्यानंतर शेती उगवण परिस्थितीचा पंचनामा केलेल्या समितीमधील कृषी विभागाचे निरिक्षकाने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा आदेशही विभगीय कृषी सहसंचालकांनी पाचही जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सोयाबिन उत्पादक पट्ट्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील शेतकºयांचा यात समावेश आहे. ब्महाबीजचे बियाणे न उगवलेल्या शेतकºयांना तातडीने बियाणे देण्याचा आदेश कृषी विभागाने राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना २३ जून रोजी दिला. त्यापैकी काहींना बियाणे देण्यात आले. तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याने नियुक्त केलेल्या समितीकडून पंचनामेही करण्यात आले. शेकडो शेतातील बियाणे सदोष असल्याचे तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे अहवालही देण्यात आले. सुरूवातीला त्या सदोष बियाण्यांबाबत शेतकºयांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला कृषी विभागाने दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. बोगस बियाणे देणाºया कंपन्यांवरही कारवाईची मागणी झाली. त्यामुळे कृषी विभागाने आता निरिक्षकांना बोगस बियाणे प्रकरणात पंचनाम्यासह न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, शेतकरी वैयक्तिकपणेही दाद मागू शकतो. तर कृषी विभागाचे निरिक्षकही उत्पादक कंपनीविरूद्ध दावा दाखल करणार आहेत. ही प्रक्रीया तातडीने करण्याचा आदेश विभागीय सहसंचालकांनी दिला आहे.
आता तक्रारी घेणे बंदपेरणीला एक महिना आटोपल्याने आता बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी स्वीकारता येणार नाहीत, याकडेही जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाºयांचे आता लक्ष वेधल्या गेले आहे.
प्रत्येक निरिक्षक दाखल करणार प्रकरणसहसंचालकांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समितीमधील प्रत्येक निरिक्षक पंचनाम्यानुसार न्यायालयात प्रकरण दाखल करणार आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले.