शहरातील रामनगरमधील गणपती मंदिर मैदानात जवळपास ५० ते ६० मोकाट जनावरे बसतात. दिवसभर ही जनावरे शहरात फिरून रात्री या मैदानावर येऊन बसतात. वासरांपासून गायी, गोऱ्हे यांचा यामध्ये समावेश आहे. या जनावरांचे मालक कोण? ते या गुरांना मोकाट का सोडतात? याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही. याचा फायदा मात्र चोरटे घेत असून अधूनमधून ते मोठे वाहन आणून हाती लागेल ते जनावर बांधून पळवून नेतात. २१ जूनच्या रात्री सुध्दा काही जनावरे पळवून नेण्यात आले आहेत. याबाबत रामनगरवासीयांना चाहूल लागताच एक छोटासा गोऱ्हा मंदिराजवळील इलेक्ट्रिक पोलला बांधलेला आढळून आला. दरम्यान, त्याची सुटका करण्यात आली. एकंदरीत या जनावरांचे मालक हे बिनधास्त राहत असल्याने जनावरे चोरून नेली जातात. तेव्हा जनावरे मालकांनी आपली जनावरे रात्री घरी नेल्यास नुकसान होणार नाही. न.प.प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी रामनगरवासीयांची मागणी आहे.
गुरे चोरणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:23 AM