यावेळी पंचायत समितीच्या सभापती नीता दिलीप देशमुख, जि. प. सदस्य आशिष रहाटे, जे. जे आरू, खंडाळाचे सरपंच रतन मानघाले, सचिव संतोष जाधव, गटशिक्षणाधिकारी वानखेडे, जि. प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वायाळ, ग्रा. पं. सदस्य देवीदास वंजारे, प्रदीप ठाकूर, शिक्षक संजय पाटील, चांगाडे, ताजने, पटवारी विजय गारोळे, आंगणवाडी सेविका मीनाक्षी ढोरे, वंदना पोपळघट, आशावर्कर मनीषा अंभोरे, संतोष अंभोरे, सुरेश सोनुने, भरत खिल्लारे, बोराडे, आरोग्य सेविका व इतर गावकरी उपस्थित होते. यावेळी आशीष रहाटे व दिलीप देशमुख यांनी आतापर्यंत कोणकोणत्या उपाययोजना केल्या, गावात किती कोरोना पाॅझिटिव्ह होते, आता किती आहेत, घरोघरी जाऊन सर्व्हे किती केला, इथून पुढेसुध्दा आपले गाव सुरक्षित ठेवण्याकरिता काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, याचा आढावा घेतला व चर्चा करून माहिती दिली.
खंडाळा देवी येथे काेविड आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:27 AM