बुलडाणा (बुलडाणा) : स्वस्त धान्य दुकानांना वितरण करणार्या सर्व शासकीय गोदामांवर आता सीसीची नजर असणार आहे. सुरुवातीला प्रयोगिक तत्त्वावर ही योजना अमरावती जिल्ह्यातील २२ गोदामांवर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच जिल्ह्यात ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे धान्याच्या काळ्या बाजाराला पायबंद बसणार आहे. या प्रणालीमुळे स्वस्त धान्य दुकानदारांनाही चाप बसणार आहे. स्वस्त धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी येत्या काळात विविध उ पाययोजना शासन करणार आहे. यात धान्य वितरणाचे आगाऊ नियोजन करून ते गावच्या सरपंचांना कळविण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी पुरवठा विभागाची गोदामे असून, तेथून तालुक्यातील गावागावांत असलेल्या दुकानांना स्वस्त धान्याचे वितरण होते. मात्र गोदामातून उचललेले धान्य गावात न जाता धान्याचे ट्रक थेट काळाबाजारात विक्रीसाठी जातात. काही धान्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार सातत्याने घडतात. शिधापत्रिकाधारकांसाठी आलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार होण्यास पायबंद घालण्यासाठी वितरणापासूनच स्वस्त धान्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. यातूनच गोदामात सीसी बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल व त्याची अंमलबजावणी त्वरित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे गोदामातील हालचाली कॅमेर्यात टि पून त्या तहसीलमधील संगणकासह अधिकार्यांच्या भ्रमणध्वनीत दिसेल. यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे धान्याची उचल करण्याबाब तची इत्थंभूत माहिती बसल्या जागी मिळणार आहे.
गोदामावर आता ‘सीसी’ची नजर
By admin | Published: November 16, 2014 12:02 AM