तालुका कृषी विभागाद्वारे आयोजित या ‘रानभाज्या महोत्सवा’चे उद्घाटन अंकुशराव तायडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, संदीप सोनुने, उध्दव थुट्टे पाटील, मंडल कृषी अधिकारी अंभोरे, सूर्यवंशी, लंबे, आरमाळ तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व आत्मा अंतर्गत खारोळे, खान यांच्यासह कषिमित्र व शेतकरी गटाचे शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकारी डाबरे व शिंदे यांनी रानभाज्यांचे मानवी आहारातील महत्व, फायदे व महोत्सवाबाबत मार्गदर्शन केले.
रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री !
तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात पार पडलेल्या या महोत्सवात शेतकरी व शेतकरी गटांनी आणलेल्या विविध रानभाज्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये करटुली, अळू, फांद, तांदुळजा, केना, चील, शेरणी, अडुळसा, पिंपळ, गुळवेल, तरोटा, पाथरी यांचा समावेश होता. दरम्यान, शेतकरी किशोर आजबे, लक्ष्मण काळे, गजानन इंगळे यांच्यासह सर्व शेतकऱ्यांनी आणलेल्या रानभाज्यांची उत्तम विक्री या महोत्सवात झाली.