साधेपणाने शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे साजरे करावेत, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले.
ते १ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते तथा नव्यानेच रुजू झालेले नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील तालुकाध्यक्ष संतोष ढोण, सुरेंद्र शिराळ, सुधाकर तायडे, राजेंद्र वऱ्हाडे, बाळकृष्ण बिचकुले, विजय जुनारे, अनिल भामद्रे, नाना भारसाकळे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी बरकते यांनी शासनाने
ठरवून दिलेल्या निकषांवर यथोचित मार्गदर्शन केले. पोळा सण साजरा करत असताना गावातून बैल फिरवण्यास बंदी असणार आहे. कुठलेही वाद्य वाजवू नये. बैलांची घरीच मनोभावे पूजा करून बाहेर नेण्याचे टाळावे.
गणेशोत्सव साजरा करत असताना ४ फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती असू नये. आरती केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळून करावी. गणेश मंडळांनी गस्त पथक नेमावे. ज्या सार्वजनिक मंडळांना परवानगी आहे अशा मंडळांनी रीतसर पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच स्थापना करावी, असे सांगितले.
ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडी-अडचणींबाबत मार्गदर्शन केले. सभेला उपस्थित पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गणेश मंडळ पदाधिकारी, सरपंच यांना सोपवलेली जबाबदारी पार पाडून कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.