देऊळगाव राजा : भारतीय सांस्कृतिक परंपरेमध्ये विविध जाती, धर्म, पंथ व सांप्रदायाचे सण पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी- परंपरेनुसार साजरे केले जातात. परंतु, आधुनिक काळात बरेचसे सण व उत्सव पर्यावरणास घातक ठरत आहेत. हीच परिस्थिती वाढदिवसाचीसुद्धा आहे. म्हणूनच, विविध जाती, धर्म, पंथ व संप्रदायाचे सर्व उत्सव तसेच थोरा मोठ्यांचे तथा प्रत्येकाचेच वाढदिवस वृक्षारोपणाने साजरे करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले आहे.
देऊळगावराजा नगरीत श्याम गुजर, इनायतखान कोटकर, स्वाती किटकुले, वनश्री जनाबापू मेहेत्रे तथा सामाजिक वनीकरण विभाग देऊळगावराजा यांचा सहभाग व मौलिक योगदानातून पंचवटीनगर देऊळगाव राजा येथे महाशिवरात्री निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी देऊळगावराजा नगरपरिषदेच्या नगरसेविका पल्लवी मल्हार वाजपेयी, श्याम गुजर, रेणुका गुजर, संपूर्ण गुजर कुटुंब, अक्षरा किटकुले,सानवी गुजर,निसर्गा मेहेत्रे, सचिन पाटील मित्र मंडळ, वनश्री जनाबापू मेहेत्रे, स्वाती किटकुले,मनोज किटकुले, संपूर्ण किटकुले कुटुंब यांच्या हस्ते वड, उंबर, पिंपळ, बेल, कडूलिंब, करंज आदी देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी लगेच रोपण केलेल्या वृक्षांना ट्री गार्ड लावून प्रत्येकाने लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार केला.