धामणगाव धाड : येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच दुर्गाबाई सुरडकर, समाधान पायघन, सविता पवार, अमोल तबडे, दिलीप सुरडकर, ग्रामपंचायत ऑपरेटर अमोल देवकर, आनंद अपार उपस्थित होते. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी बहुजनांचे अज्ञान, दारिद्र्य व समाजातील जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला होता. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे व समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी पहिली मुलींची शाळा उभी करून स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करणारे स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले असल्याची माहिती यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. यावेळी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करण्यात आले.