लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर शनिवारी मुस्लिम समाज बांधवानी ईद-उल-फितरची नमाज अदा केली. स्थानिक सजनपुरी स्थित ईद गाह येथे सकाळपासूनच मुस्लिम समाजातील आबाल वृध्दांची गर्दी दिसून आली. येथे कोटकपूरा मशीदीचे इमाम हाफिज सरफराज खान यांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे पुढारीही या ठिकाणी पोहोचले होते. काँग्रेस आणि भाजपच्यावतीने मंडप टाकून मुस्लिम समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. घरी पोहोचल्यानंतर आबालवृध्दांनी सिरखुरम्याचा मनमुराद आनंद लुटला. तत्पूर्वी शहरातील जुना फाईल मधील मरकज मशिदीत सकाळी ९ वाजता, कच्छियान मशीदीत ८:३० वाजता, जिया कॉलनीतील गुलाम यासीन खान मशीदीत ८:३० वाजता, हरि फैलातील आझाद नगर मशीदीत सकाळी ८:४५ वाजता, बर्डे प्लॉट भागातील मदिना मशीदीत सकाळी ८ वाजता, हनफिया मशिद आणि बोरीपुºयातील मशीदीत सकाळी ९:३० वाजता नमाज अदा करण्यात आली.
खामगावात ईद उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:46 IST
खामगाव : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर शनिवारी मुस्लिम समाज बांधवानी ईद-उल-फितरची नमाज अदा केली. स्थानिक सजनपुरी स्थित ईद गाह येथे सकाळपासूनच मुस्लिम समाजातील आबाल वृध्दांची गर्दी दिसून आली.
खामगावात ईद उत्साहात साजरी
ठळक मुद्देयेथे कोटकपूरा मशीदीचे इमाम हाफिज सरफराज खान यांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे पुढारीही या ठिकाणी पोहोचले होते. काँग्रेस आणि भाजपच्यावतीने मंडप टाकून मुस्लिम समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले.