देऊळगावराजा (बुलडाणा) : विदर्भाचे प्रती तिरुपती समजल्या जाणार्या देऊळगावराजा येथील बालाजी महाराजांचा मंडपोत्सव थाटात पार पडला. यावेळी हजारो भक्तांची उपस्थिती होती. आश्विन शु. १ पासून घटस्थापना झाल्यानंतर विविध उत्सवांना प्रारंभ होतो. बालाजी व लक्ष्मी यांच्या प्र तीकात्मक विवाह सोहळ्यासाठी २१ लाकडांच्या महाकाय लाटांच्या सहाय्याने ४२ मंडप उभारून पूर्वतयारी करण्यात येते. शुक्रवार ३ ऑक्टोबर विजयादशमीला वर्षातून केवळ एकदाच मुख्य मूर्ती गाभार्यातून काढून भव्य पालखी सोहळा मध्यरात्रीनंतर सुरू होणार आहे. यावेळी लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेणार आहेत.
हजारो भक्तांच्या साक्षीने मंडपोत्सव साजरा
By admin | Published: October 02, 2014 11:54 PM