स्पर्धकांनी स्पर्धेच्या अर्जासह २० जुलैपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी भाग एककरिता हागणदारीमुक्त लघुपट निर्मिती करावयाची असून, यासाठी जैव-विघटनशील, कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे विषय आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक एक लाख ६० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ६० हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ३० हजार रुपये इतके आहे. भाग दोनसाठी भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मिती करावयाची आहे. यासाठीचे विषय वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश हे देण्यात आले आहेत. याकरिता प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक एक लाख २० हजार रुपये, तृतीय पारितोषिक ८० हजार रुपये असे आहे.
ग्रामीण भागातील लघुपटानाच परवानगी
केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मिती केलेले लघुपटच या स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सर्व स्पर्धकांनी संकेतस्थळावरील नियम व अटींच्या अधीन राहून आवेदन व अर्ज सादर करावेत. लघुपट निर्मिती स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.