शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

केंद्राचे पथक गुरूवारी घेणार कापूस नुकसानाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:26 PM

बुलडाणा : राज्य शासनाने खरीपातील पीक नुकसान भरापईसाठी केंद्र सरकारीच मदत मागितली असून त्यानुषंगाने केंद्राचे पथक गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यात पाहणी तथा शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील ३५ कोटी ८२ लाख रुपयांची मदत प्राप्त झाली. येत्या दोन ते तीन दिवसात ती थेट शेतकऱ्यां च्या खात्यात जमा होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ९० हजार हेक्टरवर शेतकऱ्यां नी कापसाचा पेरा केला होता.

बुलडाणा : राज्य शासनाने खरीपातील पीक नुकसान भरापईसाठी केंद्र सरकारीच मदत मागितली असून त्यानुषंगाने केंद्राचे पथक गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यात पाहणी तथा शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येत आहे. दुसरीकडे याच दरम्यान, बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील ३५ कोटी ८२ लाख रुपयांची मदत प्राप्त झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात ती थेट शेतकऱ्यां च्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारची दोन पथके राज्यात १५ ते १८ मे दरम्यान पाहणी करून तथा शेतकर्यांशी चर्चा करून बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेणार आहेत. जवळपास १६ जणांचा यामध्ये समावेश आहे. डीएसी अ‍ॅन्ड एफडब्ल्यूचे (सीड) अश्विनीकुमार, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या प्रमुख नंदीनी गोगटे नारखेडकर, केंद्रीय जल आयोगाचे आर. डी. देशपांडे, किटकशास्त्र विभागाचे फरिदाबाद येथील डॉ. के. डब्ल्यू देशकर, ग्रामविकास विभागचे चाहत सिंग,, मुंबई येथील एफसीआयचे डीजीएम एम. जी. टेंभुर्णे, केंद्र सरकारच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयातील सहाय्यक सल्लागार ए. मुरलीधरन आणि डॉ. डी. के. श्रीवास्वत (दिल्ली) यांचा या पथकात समावेश आहे. दरम्यान, हे पथक सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे भेट देऊन शेतकर्यांशी प्रत्यक्ष कापूस नुकसानाबाबत चर्चा करणार आहे. तेथून पुन्हा हे पथक देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव येथे पोहोचणार असून तेथेही प्रत्यक्ष शेताची पाहणी करून शेतकऱ्यां शी संवाद साधरणार आहे. बोंडअळी मुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी खरीपात मोठा त्रस्त झाला होता. संपूर्ण हंगाम संपल्यानंतर केंद्राचे पथक आता जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे इतक्या विलंबाने हे पथक येण्याचा नेमका उद्देश काय? याबाबत संभ्रम आहे. परंतू राज्य शासनाने केंद्र सरकारकडे खरीपात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत मदत करण्याची मागणी केली आहे. त्यानुषंगाने हे पथक येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच प्रत्यक्षात राज्यात किती नुकसान झाले आहे, याचा अंदाजही ते शेतकऱ्यां शी थेट संवाद साधू घेणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले. बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ९० हजार हेक्टरवर शेतकऱ्यां नी कापसाचा पेरा केला होता. यापैकी बहुतांश कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाचे हक्काचे व नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटले होते. यासाठी जिल्ह्याने राज्य शासनाकडे नुकसान भरपाईची रक्कम मागितली होती.

बोंडअळी नुकसानाचा निधी प्राप्त

राज्य शासनाने खरीपात कापसावर पडलेल्या बोंड अळीमुळे झालेल्या नुकसान प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यासाठी १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. या निधी पैकी पहिल्या टप्प्यातील ४४.७८ कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षीत होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३५.८२ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला सोमवारी प्राप्त झाला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील हा जवळपास ८० टक्के निधी असून येत्या दोन दिवसात तो शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तहसिल कार्यालयांना हा निधी पाठविण्यासंदर्भातील प्रक्रिया मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती.

केंद्राचे पथक ओलांडणार लक्ष्मण रेषा !

प्रदीर्घ कालावधीने केंद्राचे हे तांत्रिक व्यक्तींचा भरणा असलेले पथक जिल्ह्यात येत असले तरी ते फक्त मराठवाड्याची सीमा ओलांडून बुलडाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे. सावरगाव माळ (सिंदखेड राजा) आणि भिवगाव (देऊळगाव राजा) हे दोन्ही गावे जालना जिल्ह्याच्या सीमेवर अवघ्या एक किमी अंतरावर आहेत. विशेष म्हणजे सावरगाव माळ या गावातील अर्धे शिवार हे मराठवाड्यातच मोडते. त्यामुळे केवळ मराठवाड्याची सीमा ओलांडून अवघ्या एक किलोमीटरवरील गावांना हे पथक भेट देऊन जाणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपातील या भेटीमुळे बुलडाणा जिल्ह्याचे असे किती हित साधल्या जाईल, हाही संशोधनाचा विषय ठरावा. घाटाखालील मोताळा, मलकापूर, खामगाव या पट्ट्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा आहे. नेमका हा पट्टा या पथकाने सोडून दिला आहे. त्यामुळे एका अर्थाने केंद्राचे पथक फक्त मराठवाड्याची सीमा ओलांडण्यापुर्ते जिल्ह्यात दाखल होत असल्याची शंका आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती