लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरिपाच्या हंगामाची नासाडी केली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील खामगाव आणि बुलडाणा तालुक्यातील रस्त्यालगतच्या शेतांचीच पाहणी या पथकाकडून करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग यांचे पथक शनिवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले. शनिवारी खामगाव तालुक्यातील खामगाव तालुक्यातील कोलोरी, टेंभूर्णा व सुटाळा तर बुलडाणा तालुक्यातील भादोला शिवारातील शेतामध्ये या पथकाने भेट दिली. दरम्यान, अगदी मुख्य रस्त्यावरील शेतांमध्येच या पथकाने पाहणी केल्याने, शेतकरी वर्गांमध्ये कमालिचा नाराजीचा सूर आहे. अतिशय धावता दौरा या पथकाने केल्याने केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा एक फार्स असल्याचा आरोप कॉं. जितेंद्र चोपडे यांनी केला.यावेळी या पथकासमवेत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी पटेल, तहसीलदार शीतल रसाळ, तालुका कृषि अधिकारी गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्भादोला येथील शेतात उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.दरम्यान, आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या आणि वादळी पावसामुळे ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झालले आहे. राज्य शासनाने जिल्ह्यास यापूर्वीच १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांच्या आसपास मदत दिलेली आहे. मात्र राज्य शासनाकडून मिळालेली ही मदत तोकडी असल्यामुे जिल्हयातील शेतकरी तीव्र रोष व्यक्त करत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आलेल्या ओला दुष्काळ पाहणी पथकाने बुलडाणा जिल्ह्यात दाखल होते नुकसानाची पाहणी केली. मात्र रस्त्या लगतच्याच शेतात जात त्यांनी ही पाहणी केली आहे. त्याचा सध्या शेतकºयांमध्ये रोष आहे. केंद्र सरकाकडून अपेक्षीत मदत मिळेल अशी आस शेतकºयांना आहे. मात्र या धावत्या पाहणमुळे शेतकºयांत नाराजी आहे. (प्रतिनिधी)बाजार समितीमधील शेतमालाची पाहणी!जिल्ह्यात परतीचा व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतमालाची प्रतवारीही घसरली आहे. अशा शेतमालाची पाहणी शनिवारी केंद्रींय पथकातील केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन केली. याप्रसंगी मुंग, सोयाबीन शेतमालाची प्रतवारी बघत संबंधित शेतकरी व अधिकाºयांकडून माहिती घेतली.
येथे केली पथकाने पाहणी!खामगाव तालुक्यातील कोलोरी येथील शेतकरी विशाल वामनराव घुले यांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पीकाची पाहणी केली. तसेच टेंभूर्णा येथील शेतकरी नरेश जगन्नाथ चौकसे यांच्या सोयाबीन व ज्वारी पीकाची, तर सुटाळा येथील शेतकरी शंकर संपत वानखेडे यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या ज्वारी पीकाची पाहणी केली. भादोला येथील शंकरअप्पा दगडअप्पा चित्ते यांच्या शेतात सोंगूण सुडी मारलेल्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ.सिंग यांनी शेतकºयाशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली.
केंद्रीय पथकाने खामगाव तालुक्यातील रस्त्यालगतच्या तीन शेतांनाच भेटी दिल्यात. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत धावती भेट दिली. केंद्री पथकाचा पाहणी दौरा हा एक फार्स होता. कोणत्याही शेतकºयांचे समाधान या दौºयामुळे झाले नाही.- जितेंद्र चोपडेनेते, अखिल भारतीय किसान सभा