शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:36 PM

तब्बल ९०२ महिलांचे सिझेरियन झाले असून हे प्रमाण ३३ टक्क्यांवर पोहचले असल्याचे चित्र आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१८ ते आॅगस्ट २०१९ पर्यंत ५ हजार १६२ महिलांची प्रसुती झाली. यापैकी ४ हजार २६० नॉर्मल तर ९०२ महिलांचे सिझेरियन झाले. सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.बुलडाणा शहरासह जिल्हाभरातील गोरगरीब रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येतात. यामध्ये प्रसुतीसाठी येणाºया महिलांचे प्रमाणही अधिक आहे. यापूर्वी येथे स्त्री रोग तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने अनेक महिलांना सिझेरियनासाठी इतरत्र रेफर करावे लागत होते. आता ही पदे भरल्याने प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलांना सिझेरियनसाठी इतर रुग्णालयांमध्ये पाठविण्याची वेळ शक्यतोवर येत नाही. त्यामुळे महिलांना याठिकाणी चांगली सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी दिवसेंदिवस सिझेरियनचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एकुण ३ हजार ३५ तर आॅगस्ट २०१९ पर्यंत २ हजार १७४ महिलांची प्रसुती झाली. यापैकी तब्बल ९०२ महिलांचे सिझेरियन झाले असून हे प्रमाण ३३ टक्क्यांवर पोहचले असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, शेगाव, मेहकर, चिखली आणि मलकापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्येच सिझेरियनची व्यवस्था आहे. इतर शासकीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना याठिकाणी प्रसुतीसाठी दाखल करावे लागते. परंतु येथे पोहचण्यासाठी विलंब होत असल्याने काही महिलांना मृत्यूही ओढवत असल्याचे प्रकार पाहायला मिळतात. असे प्रकार टाळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पातळीवर सकारात्मक उपायोजनांचा अवलंब होणे अपेक्षित आहे.जागेची कमतरता व स्वच्छतेचा अभावजिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षात दिवसाला १० ते १२ महिला प्रसुतीसाठी दाखल होतात. यापैकी नॉर्मल डिलीव्हरी झालेल्या महिलांना लवकर सुटी देण्यात येते. मात्र सिझेरियन झालेल्या महिलांना ४ ते ५ दिवस ठेवण्यात येते. येथील परिस्थितीवर एक नजर टाकल्यास या ठिकाणी असलेल्या खाटांची संख्या अपुरी पडत असल्याचे निदर्शनास येते. चांगली आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृृष्टीने याठिकाणी खाटांची संख्या वाढविण्याची गरज आहे. याबरोबरच येथे स्वच्छतेचाही मोठ्या प्रमाणात अभाव आहे. प्रसुती कक्षासमोर सर्वत्र कचरा पडला असून डुकरांचा सुळसुळाट झाला असल्याचे दिसून येत आहे.सर्वसाधारणपणे एकुण प्रसुतीच्या १५ ते २० टक्के सिझेरियनचे प्रमाण असायला हवे. जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयांमधील स्थिती तपासल्यास हे प्रमाण व्यवस्थित असल्याचे दिसून येते. एखाद्या वेळेस हे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते. मात्र यामध्ये जास्त प्रमाणात तफावत आढळून येत नाही.-डॉ. प्रेमचंद पंडीत,जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य