बुलडाणा : विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेपासून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली आणि इयत्ता बारावीचा निकाल ४ ऑगस्टला जाहीर झाला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ उडाला असून अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी काेराेनामुळे इयत्ता १२ वीचे निकाल रखडले हाेते. इयत्ता १२ वीचे निकाल लागण्यापूर्वीच सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली. त्यानंतर इयत्ता १२वीचा निकाल ४ ऑगस्ट राेजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे यावर्षी १२ वी उत्तीर्ण झालेले हजाराे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकलेले नाहीत. त्यामुळे या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी हाेत आहे.
अर्ज करण्यासाठी हवी मुदतवाढ
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपलेली हाेती. त्यामुळे यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले जिल्ह्यातील हजाराे विद्यार्थी सीईटीसाठी अर्ज करू शकलेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली. त्यानंतर इयत्ता १२वीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे सीईटीसाठी इच्छा असूनही अर्ज करता आला नाही. सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी.
-पूजा इंगळे, विद्यार्थिनी
सीईटीसाठी तयारी करूनही बारावीचा निकाल जाहीर हाेण्यापूर्वीच मुदत संपल्याने सीईटीसाठी अर्ज करू शकलाे नाही. त्यामुळे सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी.
-तुषार गरड, विद्यार्थी