- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘चेन मार्केटिंग मध्ये तीन मेंबर करा आणि अवघ्या २७ हजारात दुचाकी घेवून जा’ अशी प्रलोभन दाखवित अनेकांना गंडा घालणाऱ्या चेन मार्केटिंगच्या मोरक्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपले जाळे पसरविले आहे. यामध्ये तरूणांची मोठी फसगत झाल्याने, जिल्ह्यातील चेन मार्केटिंगच्या जाळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे.बुलडाणा जिल्ह्यात यापूर्वी ‘भाग्य सोडत’, ‘ धान्य तारणावर कर्ज आणि पिक तारणावर बियाणे’, चेन मार्केटिंग, सावकारी, भीसी आणि मोबाईल बॅकेद्वारे युवक, शेतकरी आणि महिलांची मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याची अनेक उदाहरणं ताजी आहेत.दरम्यान, चेन मार्केटिंग आणि भाग्य सोडतीत कोट्यवधींचा गंडा घालून अनेक एजंट फरार झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत.अलिकडच्या काळात ‘स्वातंत्र्य’ लकी डॉ आणि पिक तारणावर बियाणे आणि कर्ज प्रकरणातील फसवणुकीचे प्रकरण ताजे असतानाच आता जिल्ह्यात दुचाकी विक्रीची चेन मार्केटिंग टोळी सक्रीय झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात चेन मार्केटिंगचे एजंट सक्रीय झाले आहेत.
अशी आहे चेन मार्केटिंगची योजना !२७ हजार रुपये भरणारे प्रत्येकी तीन मेंबर केल्यानंतर पहिल्या सभासदाला केवळ २७ हजारात दुचाकी दिली जाते. पुन्हा या चेनमध्ये सहभागी होणाºया तीन सभासदांनी चेन चालू ठेवण्यासाठी पुढील तीन सभासद तयार करून ठेवावे.या योजनेत सहभागी होणाºया सभासदाकडून केवळ आधारकार्ड, रेशनकार्डची झेरॉक्स, पासपोर्ट फोटोची मागणी केली जाते. ७० ते ८० हजाराची दुचाकी मिळण्याच्या आमीषाला बळी पडत अनेक तरूण कोणतीही चौकशी न करता या फसव्या चेन मार्केटिंगमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे नवयुवक त्यांचे नातेवाईक आणि मित्रांची फसवणूक होत आहे.जिल्ह्यातील वाहन विक्री करणाºया विविध शोरूम मध्ये चेन मार्केटिंगच्या एजंटांनी जाळं विणले आहे. कर्जाने दुचाकी खरेदी करणाºया ग्राहकांना गाठत, त्यांची हे एजंट भेट घेताहेत. काही ग्राहकांची फायनान्स कंपनीच्या एजंटांशी भेट घालून अनेकांना गंडा घातल्या जात आहे.
प्रसिध्दीसाठी पत्रकबाजी!
बुलडाणा जिल्ह्यात चेन मार्केटिंगचे जाळे विणण्यासाठी एजंटकडून मोठ्याप्रमाणात पत्रक बाजी करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागाला अधिक महत्व दिले जात असून, पत्रकावर केवळ मोबाईल क्रमांक टाकण्यात येत आहे. पैसे घेतल्यानंतर संबंधित क्रमांक तात्काळ बंद होत असल्याचीही अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.साखळी अपयशी ठरल्यास सुलभ हप्त्याने भरा पैसे!चेन मार्केटिंगमध्ये सहभागी झालेल्या सदस्याला तीनची साखळी निर्माण करण्यास अपयश आल्यास, त्याला सुलभ हप्त्याने पैसे भरता येतील, असे आश्वासनही या एजंटकडून दिल्या जात आहे. कशाही प्रकारे सावज हेरून त्याचा विश्वास संपादन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तरूणांची फसगत होत असल्याची चर्चा आहे.
खामगाव आणि परिसरात साखळी मार्केटींगच्या अनुषंगाने कुणाची आर्थिक फसवणूक असेल. त्यांनी निर्भीडपणे तात्काळ पोलिस तक्रारी दाखल कराव्यात. पोलिस प्रशासनाकडून तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल.- प्रदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव.