शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

साेन्याची पाेथ लंपास करणाऱ्या चाेरट्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 5:28 PM

Crime News : साेन्याची पाेथ चाेरणाऱ्या महिला आणि एका पुरुष चाेरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले़. 

धाड : बसमध्ये चढत असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील साेन्याची पाेथ चाेरणाऱ्या महिला आणि एका पुरुष चाेरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले़.  पाेलिसांनी चाेरट्यांकडून लंपास केलेली साेन्याची पाेथ जप्त केली़.

साेमवारी (दि. २८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकावर केसापूर येथील चिंधाबाई गणपत बोर्डे या आपल्या मुलीसोबत धाडजवळच्या बोदेगाव येथे नातलगांना भेटून आपल्या गावी परत जाण्यासाठी धाड बसस्थानकावर बसची वाट पाहत होत्या़ दरम्यान, बसस्थानकावर शेगाव कन्नड बस (एमएच १४ बीबी २५०५) मध्ये चढताना चिंधाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत किंमत ५५ हजार रुपये, कुणीतर मागून तोडली़ ही बाब त्यांच्या तत्काळ लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला असता चोरटे पळून जाताना नागरिकांनी त्यांना पकडले़ घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले़ या घटनेत पोलिसांनी आरोपी मंगला सतीश तुमसवंर (रा. हनुमान नगर, बीड), तर अशपाक खाँ उस्मान खाँ पठाण (रा़ किन्होळा) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याची पोत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे़ आराेपीविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी