शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अर्थकारण रुळावर आणण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:11 PM

अर्थकारणास प्रारंभ झाला असला तरी त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गात अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान करण्याच्या दृष्टीने आता पावले पडत असली तरी जिल्ह्याचे अर्थकारण रुळावर आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अनलॉकदरम्यान काही प्रमाणात जिल्ह्यात आता अर्थकारणास प्रारंभ झाला असला तरी त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने आता शासनाची पावले पडत असून लॉकडाऊन दरम्यान सर्वाधिक फटका बसलेल्या लघु व मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी अशा उद्योजकांना २० टक्के अतिरिक्त कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी अतिरिक्त कुठलेही तारण देण्याची गरज सुक्ष्म व लघू उद्योजकांना पडणार नाही, अशी तजबीज करण्यात आली आहे.दुसरीकडे आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत जिल्ह्यातील फेरीवाल्यांना एक जुलै पासून दहा हजार रुपयांच्या मर्यादेत बँकांनमार्फत त्वरित कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११ पालिका आणि दोन नगरपंचायतीतंर्गत फेरीवाल्यांच्या नोंदी असून त्यांना आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने कर्ज उपलब्ध करण्यात येणार असले तरी त्याची दहा हजार रुपयापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. मोबाईल बँकींगलाही यामध्ये चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी प्रधान असल्यामुळे खरीपाच्या हंगामात ४५२ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्ज आतापर्यं वाटप करण्यात आले आहे. त्याचा लाभ ५७ हजार ३७६ शेतकऱ्यांना झाला असून जिल्ह्याचे अर्थचक्र वृद्धींगत करण्यास याची मोठी मदत होणार आहे.

सुक्ष्म व लघू उद्योगाला मात्र फटकासुक्ष्म व लघू उद्योगाला मात्र लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे. हातावर काम असलेल्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे अशांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. सोबतच रिकरींगच्या माध्यमातून होणारी बचतही थांबली आहे. त्यांना आता खºया अर्थाने उभारी देण्याची गरज आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र थोड्या कालावधीत ही स्थिती बदलेले, असा विश्वास सहकाराताली जाणकार तथा आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

११ टक्के नागरिकांना ‘गरीब कल्याण’चा आधार!लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत जिल्ह्यातील तीन लाख ३१ हजार ९१ व्यक्तींच्या जनधन खात्यात मार्च, एप्रिल आणि जून महिन्याचे मिळून एकूण ५७ कोटी १६ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळेही जिल्हयाच्या अर्थकारणास सध्या बºयापैकी गती आलेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था