खामगाव : शेतकºयांपुढील संकटे काही करता कमी होताना दिसत नाहीत. सोयाबीनवर येत असलेला ह्यकरपा रोगह्ण बघता शेतकºयांपुढे आता नविन संकट उभे राहीले आहे. खामगाव परिसरातील अनेक शेतकरी यामुळे चिंतेत आहेत.गेल्या तिन ते चार वर्षांपासून शेतकºयांपुढील संकटे वाढतच आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात वषानुवर्षे घट येत आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने पिके आली नाहीत. बागायती शेती करणाºयांपुढे मागील वर्षी बोंडअळीचे संकट उभे राहीले होते. सोयाबीन उत्पादक अनेक शेतकºयांनी सोयाबीन वखरून टाकले होते. एकंदरीत मागील वर्ष शेतकºयांसाठी अतिशय कठीण गेले. यावर्षीही परिस्थिती फार काही चांगली नाही. आधी पेरणीसाठी पावसाने वाट पाहायला लावली. पेरणीनंतरही पावसाने दडी मारली. यानंतर आलेल्या पावसाने पिकांना जिवदान मिळाले खरे, मात्र पिकांवर आलेल्या रोगाने शेतकºयांची चिंता वाढली आहे. सध्या खामगाव परिसरात घाटपुरी ते पिंपळगाव राजा रोडने अनेक शेतात सोयाबिनवर ह्यकरपा रोगह्ण आल्याचे दिसून येत आहेत. झाडाला लागलेल्या शेंगा यामुळे वाळत असल्याचे दिसून येत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची तसेच शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.बॉक्स..................बोरिअडगाव परिसरात अळ्यांचे आक्रमणबोरीअडगाव: मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे व सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांनी आक्रमण केले आहे. सध्या झाडाला शेंगा लागत आहेत. बºयाच ठिकाणी शेंगा परिपक्व होत आहेत. परंतु अळ्यांनी आक्रमण केले असून पानांची चाळणी करत आहेत. आधीच पेरणी नंतर पावसाचा खंड पडल्याने पिके धोक्यात सापडली होती. परंतु गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्याने सोयाबीन सह कपाशी, उडीद व तूर या पिकांना संजीवनी मीळाली. सोयाबीनला शेंगा लागल्या असून परिपक्व होत आहेत. परंतु पाने पोखरणारी अळी व उटं अळी या अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणी करताना प्रोपेनोफॉस ५० टक्के किंवा प्रोपेनोफॉस ४० टक्के अधिक सायपर मेथीन ४ टक्के यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी ३० मिली औषध १५ लिटर पाण्यात मिसळून करावी. पॉवर स्प्रे पंपासाठी औषधाची मात्रा दीडपट करावी, असे आवाहन कृषी साहाय्यक रोहन अवचार यांनी केले आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपुढे 'करपा' चे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 4:37 PM