घाटाखालील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:25 PM2019-07-23T14:25:37+5:302019-07-23T14:25:42+5:30

काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना आता स्वपक्षातील दुसºया फळीच्या नेत्यांचा सामना केल्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Challenges of second class leaders to congressional leaders | घाटाखालील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आव्हान!

घाटाखालील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आव्हान!

googlenewsNext

- अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आगामी विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून काँग्रसने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. पक्ष नेतृत्वाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, दुसºया फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना आता स्वपक्षातील दुसºया फळीच्या नेत्यांचा सामना केल्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या दारूण पराभवाचा धडा घेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाच्या नेत्रूांचा शोध सुरू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद या मतदार संघात पराभूत झालेल्या नेत्यांसोबतच, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सामान्य कार्यकर्ता ते दुसºया फळीतील नेतृत्व, संघटनात्मक पदाधिकारी यांना उमेदवारी अर्ज सादर करण्याची संधी पक्षाने दिली होती. या संधीला प्रतिसाद देत, घाटाखालील दुसºया फळीतील नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केलेत. परिणामी, आता काँग्रेस पक्षाकडून आपलीच उमेदवारी निश्चित असलेल्या पराभूत आणि मातब्बर नेत्यांना पक्षातंर्गतच आव्हान उभे ठाकले आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिलेल्या काही उमेदवारांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. थोड्याफार फरकाने कर्नाटकयेथेही हा प्रकार घडला. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होवू नये, यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. दगाफटका झाल्यास, दुसºया फळीचा पर्याय पक्षनेतृत्वाकडून तयार ठेवल्या जात आहे.
या मतदारसंघात उभे राहील आव्हान
खामगाव मतदार संघात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी आव्हान दिले आहे. पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे अमरावती विभागीय सरचिटणीस धनंजय देशमुख यांचाही पर्याय म्हणून विचार होवू शकतो.
मलकापूर मतदार संघात डॉ. अरविंद कोलते यांना अ‍ॅड. हरिश रावळ, नारायण निहलाणी, राजू पाटील आणि राजेश एकडे यांनी आव्हान उभं केले आहे. राजेश एकडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा मलकापूर विधानसभा मतदार संघात सुरू आहे.
जळगाव जामोद मतदार संघात काँग्रेसनेते रामविजय बुरूंगले यांना पर्याय म्हणून प्रसेनजीत पाटील, ज्ञानेश्वरदादा पाटील, स्वातीताई वाकेकर उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.


मलकापूर, जळगाववर राष्ट्रवादीचा दावा!
घाटाखालील तीन विधानसभा मतदार संघापैकी जळगाव जामोद अथवा मलकापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा, अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार संघ सुटल्यास मलकापूर मतदार संघातून संतोष रायपुरे तर जळगाव जामोद मतदार संघातून संगीतराव भोंगळ उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.

Web Title: Challenges of second class leaders to congressional leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.