लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: श्री दत्तगुरूच्या निर्गुण पादुका स्थापित असलेल्या महाराष्ट्रातील चार पीठापैकी एक असलेल्या श्री मुक्तेश्वर आश्रमाद्वारे सोमवारी दुपारी ४: ३० वाजता संचारेश्वरांची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.श्री संचारेश्वरांच्या निर्गुण पादुका उत्सवानिमित्त श्री निर्गुणपादुका संचारेश्वर ट्रस्ट खामगावच्यावतीने १७ डिसेंबर ते २३ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत स्थानिक मुक्तेश्वर आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गाणगापूर, कारंजा आणि लातूरनंतर महाराष्ट्रात केवळ खामगावात श्री दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांची स्थापना प.पू. नृसिंह संचारेश्वर उपाख्य धर्मभास्कर श्री संत पाचलेगावर महाराज यांनी मुक्तेश्वर आश्रमात केली आहे. दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनासाठी तसेच या आश्रमात मनोकामना पूर्ण होत असल्याची अनुभूती अनेकांना आली आहे. त्यामुळे खामगावातील निर्गुण पादुका महोत्सवाला राज्यातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभते. यावर्षी सोमवारपासून सुरू झालेल्या निर्गुण पादुका महोत्सवास मुंबई, अहमदनगर, पुणे, गाणगापूर, कारंजा, अमरावती, जालना, औरंगाबाद, माहूर येथील भाविकांसोबतच उज्जैन आणि ओंकारेश्वर, गुजरात, सुरत येथील भाविकही दाखल झाले आहेत. अनुष्ठान, कीर्तन, प्रवचनानंतर रविवारी या उत्सवाची शोभायात्रेने सांगता करण्यात आली. यावेळी सकाळी पूजा अर्चा आणि महाप्रसादानंतर संचारेश्वरांच्या पादुकांची तसेच मूर्ती भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
दत्तगुरूंच्या नामघोषाने दुमदुमली खामगाव नगरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 2:36 PM