शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गावागावात रथ, रॅली; पोटजातीच्या तोडणार भिंती!

By admin | Published: September 13, 2016 2:49 AM

बुलडाणा जिल्ह्यातील बैठकांना समाजातील सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. १२: मराठा क्रांती मोर्चाची तयारी करण्याकरिता गावा-गावात रथ व रॅली काढण्यात येणार आहे. यासोबतच या मोर्चाद्वारे पोटजाती संपवून सकल मराठा समाज लाखोंच्या संख्येने सहभागी करण्याचा निर्धार चिखली येथील बैठकीत सोमवारी करण्यात आला.२६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची तयारी जोमात सुरू असून, ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी बुलडाणा येथे पार पडलेल्या सभेनंतर सोमवारी चिखली येथे सभा पार पडली. या सभेत मोर्चाच्या आयोजनाकरिता विशेष रथ तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. या रथाद्वारे २६ सप्टेंबर रोजी पार पडणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे; तसेच गावा-गावांमध्ये दुचाकी रॅलीही काढण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये पोटजाती दूर सारून सकल मराठा समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात राजपूत, कुणबी, मराठा, देशमुख, धनवटे, वाईनदेशी, दखणे, दक्षिण मराठा आदी पोटजाती आहेत. काही राजकारण्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी या पोटजातीमध्ये नागरिकांना विभागून जातीयतेचे राजकारण केले. त्यामुळे या पोटजातींमध्ये काही ठिकाणी द्वेश निर्माण झाला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने हा द्वेश संपवून एकत्र येण्याचे आवाहन या बैठकांमध्ये करण्यात आले आहे. मूळ व कूळ न बघता या पोटजातींच्या भिंती तोडून सकल मराठा समाजाने एकत्र होऊन लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अन्य जातीमधील नागरिकांचाही सहभाग ४मराठा समाजाच्या या मोर्चाला अन्य समाजातील नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लीम समाजातील नागरिकांनीही मोर्चेकर्‍यांना पाणी वाटप करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यासोबतच चिखली शहरात भगवे झेंडे लावण्याचे आवाहन काही समाजातील नागरिकांनी केले.मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही ४बुलडाणा, लोणार व चिखली येथे पार पडलेल्या सभांमध्ये मराठा समाजाचा मोर्चा हा कोणत्याही समाजाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीचा विरोध नसल्याचे उपस्थितांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. समाज आपल्या मागण्या घेऊन एकत्र येत असून, कोपर्डी घटनेचा निषेध करीत आहे; मात्र या मोर्चाच्या माध्यमातून कुणालाही लक्ष्य करणे किंवा कुणाच्या विरोधात बोलणे, हे उदिष्ट नसल्याचे बैठकांमधून स्पष्ट करण्यात येत आहे.