लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: देशाच्या आर्थिक व्यवस्थेत सनदी लेखापालांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी केले. सनदी लेखापालांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता डॉ.रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठीही सनदी लेखापालांनी प्रयत्न करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी यावेळी केले.सनदी लेखापाल अकोला शाखेच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, अमरावतीच्या सहकार्याने वेस्टर्न रिजनल काऊंन्सील इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊन्टस आॅफ इंडियातर्फे ११ व १२ आॅगस्ट असे दोन दिवस हीपरिषद आयोजित केली आहे. माता सरस्वती व गजानन महाराजांच्या फोटोला हार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी डॉ.रणजित पाटील यांचे शाल, श्रीफळ व स्मृर्तीचिन्ह देऊन सी.ए. आनंद जाखोटिया (पुणे) यांनी स्वागत केले. प्रसंगी व्यासपीठावर प्रफुल्ल छाजेड नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट, सी.ए. उमंग अग्रवाल, सी.ए. शिवाजी झावरे, सी.ए. सतीष लाठी, सी.ए. अनिल भंचरी, सी.ए. जितेंद्र खंडेवाल, सी.ए. अभिजीत केळकर, सी.ए. अजय जैन, माजी राष्ट्रीय अध्यक्ष सी.ए. जगदीश शाह, सी.ए. उमेश शर्मा, श्रीनिवास जोशी, सीए श्रृती शाह, सीए दुर्गेश काबरा, सीए सर्वेश जोशी आदींसह इतर मान्यवरांची व्यासपीठवार उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सी.ए. उमंग अग्रवाल यांनी करून दिला. (शहर प्रतिनिधी)
देशाच्या अर्थव्यवस्थेत सनदी लेखापालांचा वाटा मोलाचा- रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 5:43 PM
शेगाव: देशाच्या आर्थिक व्यवस्थेत सनदी लेखापालांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी केले.
ठळक मुद्देशेगाव येथे सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन. डॉ.रणजित पाटील यांचे शाल, श्रीफळ व स्मृर्तीचिन्ह देऊन सी.ए. आनंद जाखोटिया (पुणे) यांनी स्वागत केले. वेस्टर्न रिजनल काऊंन्सील इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊन्टस आॅफ इंडियातर्फे ११ व १२ आॅगस्ट असे दोन दिवस हीपरिषद आयोजित केली आहे.