लोणार : गोरगरिबांना अल्प दरात स्वस्त धान्य उपलब्ध होण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणाली कार्यान्वित केली; मात्र शासनाकडून वाट पासाठी येणार्या ५0 किलो धान्याच्या पोत्यातून ४ ते ५ किलो धान्याची अफरातफर करून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नियमापेक्षा कमी धान्यपुरवठा गोदामपालकाकडून होत आहे.अन्नधान्यापासून कोणताही घटक वंचित राहू नये, याकरिता शासनाने अन्नपूर्णा, अंत्योदय, अन्न सुरक्षा आदी योजना कार्यान्वित आहेत. याअंतर्गत गहू २ रुपये, तांदूळ ३ रुपये, ज्वारी १ रुपया किलोप्रमाणे उपलब्ध करून दिली. गोरगरीब शेतमजुरांसाठी या योजना जीवनदायी ठरल्याने योजनेचा लाभ हजारो लाभार्थी घेत आहेत. शासनाकडून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वाटपासाठी गहू, तांदूळ, ज्वारी आदीचे ५0 किलोचे पोते येथील धान्य गोदामावर उतरविण्यात येतात. गेल्या काही महिन्यांपासून येथील स्वस्त धान्याचे शासकीय गोदाम पालक कैलास सोनुने हे पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकार्यांच्या आशीर्वादाने गत कित्येक महिन्यांपासून शासनाकडून प्राप्त होणार्या स्वस्त धान्याच्या ५0 किलोच्या पोत्यातून ४ ते ५ किलो धान्याची अफरातफर करीत आहेत. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना नियमाप्रमाणे अन्नधान्याचे वाटप न होता अपुरा धान्यसाठा मिळतो. स्वस्त धान्य दुकानदारांकडून योजनेतील लाभार्थ्यांना पूर्ण धान्याचे वाटप होत नाही. शासकीय नियमाप्रमाणे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना स्वस्त धान्याचे वाटप न करणार्या गोदामपालकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून अनेक वेळा तक्रारी केल्या. तरीसुद्धा याबाबत कोणतीही दखल घेतल्या गेलेली नाही. गोदामपालक हे स्वस्त धान्य दुकानदारांना नियमाप्रमाणे मालाचे वाटप करीत नाही. अन्नधान्य वाटपाच्या दिवशी लहान दुकानदारांकडून ५00 रु पये, तर मोठय़ा दुकानदारांकडून १000 रुपये घेतल्याशिवाय माल वाटप करीत नाहीत. पुरवठा निरीक्षकअजय पिंपरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोदामपालकाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय नियमापेक्षा कमी अन्नधान्याचा पुरवठा होणे ही गंभीर बाब असल्याचे मान्य करून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगीतले.*धान्य न मोजताच वाटपप्रत्येक महिन्याला शासकीय धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना इलेक्ट्रॉनिक्स काट्याद्वारे मोजून स्वस्त धान्याच्या मालाचे वाटप करण्याचे आदेश आहेत. तरीसुद्धा गोदाम पालकाकडून दुकानदारांना काटा न करता मालाचे वाटप करण्यात येते. गत २ वर्षांपासून गोदामातील इलेक्ट्रानिक्स काटा बंद पडला आहे.
स्वस्त धान्याची अफरातफर
By admin | Published: July 11, 2014 11:58 PM