सिंदखेडराजा (बुलडाणा) : बँक ऑफीसर असल्याचे फोनद्वारे सांगून एका महिलेचा बचत खात्या तून १ लाख ३८ हजार ७८0 रुपये काढून फसवणूक केल्याची घटना २६ सप्टेंबर पूर्वी बेलापूर जिल्हा ठाणे येथे घडली होती. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी राहूल नामक अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील झोटींगा येथील सौ.चंद्रभागा पांडूरंग वाघ या महिलेने साखरखेर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे की, राहूल नावाच्या अज्ञात व्यक्तीने त्यांचा मुलगा पांडूरंग वाघ यास फोनद्वारे तुमचा बचत खाते क्रमांक व एटीएम पासवर्ड सांगा. नाहीतर पैसे काढ ता येणार नाहीतह्णह्ण. त्यामुळे शरद याने सदर व्यक्तीस बचत खाते क्रमांक व एटीएम पासवर्ड सांगि तला. त्याचा उपयोग करीत राहूल नामक इसमाने सौ.चंद्रभागा वाघ यांच्या खात्यातून १ लाख ३८ हजार ७८0 रुपये काढून ऑनलाईन शॉपींग करुन फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
एक लाख रुपयाने फसवणूक
By admin | Published: October 02, 2014 12:26 AM