खामगाव : घाटपुरी येथील अंगणवाडीमध्ये बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक सुरू असल्याची तक्रार रहिवासी तथा काँग्रेस झोपडपट्टी सेलचे तालुकाध्यक्ष नारायण इंगळे यांनी केली आहे. घाटपुरी अंगणवाडीत २00९ पासून बनावट जास्त वयोगटातील विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक सुरू आहे. याबाबत या विभागाच्या जिल्हा पातळीवरील अधिकार्यांकडे तक्रार केली; परंतु त्यांच्याकडून प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न होत आहे. माहितीच्या अधिकारात सदर अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांच्या जन्माचे दाखले मागितले असता ते देण्यात आले नाहीत. या अंगणवाडीत हजेरी रजिस्टरवर नाव नोंद असलेले विद्यार्थी दुसर्या शाळेत शिकत आहेत. तरीदेखील या विद्यार्थ्यांच्या नावाखाली पोषण आहार घेऊन त्याची अफरातफर सुरू आहे. ही शासनाची मोठी फसवणूक असून, याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.
बनावट विद्यार्थी दाखवून फसवणूक
By admin | Published: September 13, 2014 12:18 AM