लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘ई-कॉमर्स’ विरोत भारत बंदला प्रतिसाद देत, खामगावात मोर्चा काढला. या मोर्चात खामगाव शहरातील केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांसह जिल्ह्यातील १४०० च्यावर औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला.
केंद्रसरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषध विक्री करण्याचा दिलेला आदेश, ई-फार्मसीजना बिनधास्तपणे कार्य करण्याची दिलेली मुभा आदी बाबींचा निषेध नोंदविण्यासाठी हा बंद पुकारलेल्या आहे. या बंदमुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. दरम्यान, संघटनेच्यावतीने आपल्या तीव्र भावना निवेदनात व्यक्त करण्यात आल्या. यामध्ये जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात बुलडाणा जिल्हा केमिस्ट असो.चे राजेंद्र नहार, रामचंद्र आयलानी, सुनील लाहुडकार, धर्मेश शहा, अजय जैन, नंदकिशोर कोंडेकर, गणेश चांडक, चंद्रकात नारखेडे, रविली टाले, सुरेश थारकर आदी आदी सहभागी झाले होते.