दुसरीकडे संगमचौकात बसस्थानकामधील व्यापारी गाळ्यांसमोरील खुल्या जागेत हा पुतळा उभारण्यात येणार असून त्याच्या लगत असलेल्या वीज वाहिन्या या भूमिगत करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असून, त्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, या अश्वारूढ पुतळ्यासोबतच आठ घोडे व त्यावर मावळे, दोन हत्ती आणि पुरातन किल्ल्याचा आकर्षक असा देखावाही येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती आ.संजय गायकवाड यांनी सांगितले. सोबतच पुतळा परिसराची स्वच्छता आणि देखभालीसाठी येथे दोन सेवाधारीही ठेवण्यास प्राधान्य राहणार असल्याचे ते म्हणाले. यासोबत बुलडाणा शहरातील घरपत्वे या उपक्रमासाठी किमान एक रुपया देणगी घेण्याचा मानस असून, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला येथील स्मारकात आपल्या सर्वांचा हातभार लागल्याचे समाधान मिळले, असे समितीचे उपाध्यक्ष राजेश हेलगे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी राजे सोमवारी बुलडाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:40 AM