ते मेहकर येथील नागसेन चौकात आयोजित जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे प्रा. संजय वानखेडे, सुनील अंभोरे, ॲड संदीप गवई, शैलेश गवई आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. उपस्थित सर्व भीमसैनिकांनी यावेळी शाहू महाराजांचा विजय असो, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमाला संतोष सरदार, आशुतोष तेलंग, आकाश अवसरमोल, रवी पवार, करण देबाजे, सागर गवई, दीपक अवसरमोल, सूरज अंभोरे, सुमेध वानखेडे, सचिन वाठोरे, झोबडे भाऊ, बाळू अडेलकर, पवन नरवडे, निखिल देबाजे, सतीश आराख, अजय खडसे, आदित्य मोरे, ऋषिकेश डोंगर्दीवे, चिंटू इंगळे, अनिकेत देबाजे, राज देशमुख आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. तथा मेहकर शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. संचालन प्रा. संजय वानखेडे, तर आभार ॲड. संदीप गवई यांनी मानले.
छत्रपती शाहू महाराज हेच खरे आरक्षणाचे जनक : कैलास सुखधाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:22 AM