शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

छत्रपती शिवराय पुतळा विटंबना निषेधार्थ मूकमोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:53 PM

चिखली : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्नपती शिवाजी महाराज यांच्या येथील प्रमुख चौकात असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ १८ सप्टेंबर रोजी चिखली शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येऊन मूक मोर्चा काढण्यात आला. सोमवार हा येथील आठवडी बाजाराचा दिवस असतानाही हा बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. तर घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मूक रॅलीत शिवप्रेमी जनतेचा उत्स्फूर्त व अभूतपूर्व सहभाग पहावयास मिळाला.

ठळक मुद्देचिखलीत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या येथील प्रमुख चौकात असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ १८ सप्टेंबर रोजी चिखली शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येऊन मूक मोर्चा काढण्यात आला. सोमवार हा येथील आठवडी बाजाराचा दिवस असतानाही हा बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. तर घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मूक रॅलीत शिवप्रेमी जनतेचा उत्स्फूर्त व अभूतपूर्व सहभाग पहावयास मिळाला.नेहमी वर्दळ असलेला व शहराच्या मध्यस्थानी असलेल्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शनिवार, १६ सप्टेंबर रोजी एका माथेफिरुने दगड मारुन विटंबना केली  होती. या घटनेनंतर अवघ्या तीन तासांमध्ये पोलिसांनी तत्परतेने हे कृत्य करणार्‍या मनोरूग्ण गजानन सोनाजी इंगळे या संशयितास अटकही केली; मात्र वारंवार शहरामध्ये पुतळ्याच्या विटंबनेचे प्रकार घडत असल्याने संतप्त शिवप्रेमींनी १८ सप्टेंबर रोजी चिखली बंदची हाक दिली होती. या आवाहनास शहरवासीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याने सोमवारी शहरातील सर्वच लहान-मोठे व्यावसायिक प्रतिष्ठाणे दिवसभर पूर्णपणे बंद होती. दरम्यान, येथील आठवडी बाजारदेखील सोमवारी भरला नाही. त्यामुळे शहरातील भाजीपाला मार्केटसह गुरांचा बाजारदेखील इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे बंद असल्याचे जाणकार सांगतात. या बंदसाठी सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नेत्यांचा पुढाकार असल्याने बंद आणि मूक रॅली अत्यंत शिस्तीत आणि कमालीच्या शांततेत पार पडली. या अंतर्गत आज काढण्यात आलेली रॅली ही मूक रॅली असल्याने रॅलीदरम्यान कोणत्याही प्रकारची घोषणा देण्यात आली नाही. या माध्यमातूनदेखील निषेधाचा एक नवीन पायंडा या माध्यमातून चिखलीकरांनी घालून दिला, हे विशेष. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झालेली भव्य मूक रॅली जयस्तंभ चौक, महात्मा बसवेश्‍वर चौक, चिंच परिसरातील बैलजोडी चौक, स्वामी विवेकानंद मार्ग, राजा टॉवर, बाबू लॉज परिसर, डी.पी.रोड आणि बस स्थानक मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर शांततेत विसर्जीत करण्यात आली.या रॅलीत आमदार राहुल बोंद्रे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, माजी जि.प.अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, माजी आमदार बाबूराव पाटील, जि.प.सभापती श्‍वेता महाले पाटील, नंदकिशोर सवडदकर, संजय चेके पाटील, सुधाकर काळे, बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, जि.प.सदस्य डॉ.ज्योती खेडेकर, कुणाल बोंद्रे, सलीम मेमन, रफीक कुरेशी, अनिस शेख, डॉ.म.इसरार, कपिल खेडेकर, मदनराजे गायकवाड, संजय पांढरे, अतहरोद्दीन काझी, किशोर कदम, संजय गाडेकर, सुरेशआप्पा खबुतरे, ह.भ.प.प्रकाशबुवा जवंजाळ, पंडितराव देशमुख, डॉ.प्रतापसिंग राजपूत, बाळू वराडे, दत्ता खरात, गणेश बरबडे, शिवराज पाटील, अँड.मंगेश व्यवहारे, प्रा.डॉ.राजू गवई, गोविंद देव्हडे, गोपाल देव्हडे, रोहीत खेडेकर, विठ्ठल जगदाळे, दत्ता सुसर, सुभाष राजपूत, निलेश अंजनकर, शिवाजी देशमुख, प्रशांत ढोरे पाटील, प्रमोद पाटील, निलय देशमुख, हिम्मतराव जाधव, डॉ.विष्णूभगवान खेडेकर, डॉ.रामेश्‍वर दळवी, डॉ.योगेश काळे, डॉ.शिवशंकर खेडेकर, डॉ.गोंधणे, बंटी लोखंडे, अँड.विलास नन्हई यांच्यासह हजारो शिवप्रेमींचा सहभाग होता. दरम्यान बंद व मूक रॅली शांततेत पार पडावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी आणि ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात शहरात चोख पोलीस बंदोबस्त होता.