लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा २0 ते २२ डिसेंबरदरम्यान पार पडल्या. या स्पध्रेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांच्या हस्ते करण्यात आले.तीन दिवसीय या स्पध्रेत अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदविला. स्पध्रेचा अंतिम सामना बी.एन. इंजिनिअरिंग कॉलेज पुसद विरुद्ध अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली यांच्यात झाला. अत्यंत चुरीशीच्या व उत्कंठावर्धक या सामन्यात अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाची चमू उपविजयी ठरली. महाविद्यालयाच्या या चमूमध्ये निखिल राठोड, शार्दुल भराड, प्रियजित साखरे, आशीष पाखरे, विजय देशमाने या विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान, स्पध्रेचे यशस्वी आयोजन व उपविजेपद मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिद्धिविनायक बोंद्रे, सचिव आ. राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. यादव व विश्वस्तांनी समाधान व्यक्त केले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुनीता गायकी, चोपडे, राम काछवाल, लंके यांनी परिश्रम घेतले.
चिखली : विद्यापीठस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:06 AM
चिखली: स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा २0 ते २२ डिसेंबरदरम्यान पार पडल्या. या स्पध्रेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देअनुराधा अभियांत्रिकीच्या चमूला उपविजेतेपद