कोरोनामुळे अनेक परंपरागत उद्योग व्यवसायांना आर्थिक चणचण भासत आहे. ग्रामीण व शहरी भागातील अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थिती ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून दि. चिखली अर्बन बँक कर्ज उपलब्ध करून देत आहे. यासाठी महिला बचतगटांची नोंदणी करून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बचतगट मिळवून देत ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभे व्हावेत व त्याद्वारे रोजगारनिर्मिती करण्याचा मानस असून, सर्व बचतगट व सदस्यांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या परिसरात उद्योग सुरू करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, तज्ञसंचालक आनंद जेठाणी संचालक, नरेंद्र लढ्ढा, स्थानिक शाखा सल्लागार प्रकाश हरगुणांनी, नामदेव भराड, गोविंद गिनोडे, अल्का पूरनकर, अर्चना खबुतरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भंगिरे, शाखाधिकारी जोशी, बचतगट प्रतिनिधी देवीदास सुरूशे, ज्योती परिहार, पवन तेलग्रे, यांची प्रमुख उपस्थिती होती. (वा.प्र.)
चिखली अर्बनद्वारे महिला बचत गटांना ५० लाखांचा वित्त पुरवठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:24 AM