शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

चिखलीत नगरसेवकांच्या जेवणावळीला बंडखोरीचा ‘ठसका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:41 AM

चिखली : चिखली नगरपालिकेमध्ये एका तपानंतर भाजपाला एकहाती सत्ता देऊन चिखलीकरांनी शहराच्या विकासाचं एक देखणं स्वप्न पाहिलं, त्याला कारणही तसंच होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान चिखली शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द जनतेला दिला होता. या शब्दाखातर भाजपाच्या पदरात जनतेने भरभरून मतांचा जोगवा टाकला; मात्र भाजपाला मिळालेलं हे एकहाती यश अंतर्गत गटबाजीमुळे पचनी पडत नसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेत भाजपाची बंडाळीभाजपला आश्‍वासनांचा विसर 

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली नगरपालिकेमध्ये एका तपानंतर भाजपाला एकहाती सत्ता देऊन चिखलीकरांनी शहराच्या विकासाचं एक देखणं स्वप्न पाहिलं, त्याला कारणही तसंच होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान चिखली शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द जनतेला दिला होता. या शब्दाखातर भाजपाच्या पदरात जनतेने भरभरून मतांचा जोगवा टाकला; मात्र भाजपाला मिळालेलं हे एकहाती यश अंतर्गत गटबाजीमुळे पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर कालपरवाकडे नगरसेवकांना दिलेल्या एका जेवणावळीतून दिसून आले. पालिकेतील झाडून सार्‍या नगरसेवकांना या जेवणावळीमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. केवळ नगराध्यक्षांना पद्धतशिरपणे डावलून ही जेवणावळी औद्योगिक परिसरात पार पडल्याने या जेवणावळीस विशेष महत्त्व प्राप्त झाले; मात्र या जेवणावळीच्या आडून नगरसेवकांना बंडखोरीचे बळ दिल्या गेल्याची चर्चा होत असल्याने या जेवणावळीचा ठसका जिल्हाभरातील भाजपा परिवारास लागला आहे.त्याचे झाले असे की, चिखलीत प्रिया कुणाल बोंद्रे यांना नगराध्यक्षपदी बसवून चिखलीत एक नवे सत्ताकेंद्र निर्माण केल्या गेले. हे होत असताना कुणाल बोंद्रेंच्या रूपाने नवे युवा नेतृत्वदेखील भाजपाच्या हाती लागले. जुन्या जाणत्या निष्ठावान भाजपायींना जरी ही बाब नवखी होती तरी त्याला कमळाचा सुगंध असल्याने त्यांनी या युवा नेतृत्वाचा स्वीकार केला; मात्र ही बाब भाजपाच्या नेत्यांना पचनी पडण्यास जड जात असल्याने या-ना-त्या कारणावरून खुसपट काढून अडचणी वाढविण्याचे काम भाजपातील गटबाजी करीत असते. या ठिकाणी कुणाल ऐवजी दुसरा अजून कोणी असता, तर त्याच्यासोबतदेखील हेच घडले असते, हा भाग अलहिदा. भाजपामध्ये उघड-उघड काहीच चालत नाही. तेथे सगळे बंदद्वार अथवा अंधारातच चिंतन बैठकीद्वारे चालते. भाजपाचे हे सूत्र नव्याने भाजपामध्ये आलेल्या अनेक नेत्यांना उमजलेले नाही. त्याचा परिपाक कालपरवाकडे येथील औद्योगिक वसाहतीत रात्री अंधारात झालेल्या मसालेदार जेवणावळीवरून दिसून आले. सेक्सपियरने असे म्हटले आहे की, नावात काय आहे? परंतु राजकारणात नावात आणि फोटोत बरेच काही असते. त्या रात्री झालेल्या जेवणावळीच्या पाठीमागेदेखील अशाच नावाची आणि फोटोची किनार आहे. चिखली पालिकेच्या कार्यक्रमांमध्ये सन्मानजनक ठिकाणी (प्रोटोकॉलनुसार) नाव व फोटो टाकल्या जात नसल्याने या जेवणावळीचे प्रायोजकत्व एका गटाच्या गळी उतरविण्यात आले असले, तरी या जेवणावळीलादेखील अनेक कंगोरे आहेत. पालिकेत अनेक कर्मचारी आमचे ऐकत नाहीत, आमच्या वार्डात कामे होत नाहीत, ते काम करीत असताना आम्हाला विश्‍वासात घेतल्या जात नाही, मर्जीतला कंत्राटदार दिला जात नाही, असे नानाविध कारणे आहेत. या कारणांवरून नगरसेवकांमध्ये संकलीत असलेला असंतोष जेवणावळीच्या रूपाने कॅश करण्याचा प्रयत्न केल्या गेला. जेवणावळीला अपवादात्मक सोडले तर झाडून सारे नगरसेवक (काही विरोधी पक्षातील छुप्या मार्गाने) सहभागी होते.  या जेवणावळीमधून केवळ नगराध्यक्षांनाच डावलल्या गेल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या जेवणावळीमुळे प्रायोजकांपेक्षा इतरांनीच कसे उट्टे काढले, अशा फुशारक्या मारण्यात समाधान मानले. हे सारे घडत असताना जेवणावळीतील इतवृत्तांत नगराध्यक्षांना ‘लाइव्ह’ ऐकविण्यातदेखील अनेक जण अग्रेसर होते. त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंगच थेट पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, कोअर कमिटी सदस्य आमदार डॉ.संजय कुटे आणि जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांना नगराध्यक्षांनी ऐकविल्याने त्याची दखल घेऊन भाऊसाहेबांनी २२ सप्टेंबर रोजी नगरसेवकांची तातडीची बैठक चिखलीत बोलाविली असल्याचे समजते, तर जिल्हाध्यक्षांनीदेखील त्वरेने भ्रमणध्वनीवरून काही महत्त्वाच्या नगरसेवकांशी चर्चादेखील केली असल्याचे कळते. आता या बैठकीतून काय बाहेर येणार, हे येणारा काळच ठरवेल. हे सारे जरी खरे असले तरी हे भाजपाच्या पक्षशिस्तीत बसत नाही. नगराध्यक्ष जर नगरसेवकांची कामे करत नसतील तर पक्षo्रेष्ठींकडे ही बाब मांडल्या जाऊ शकत होती; मात्र तसे न घडता ती बाब औद्योगिक वसाहतीमध्ये चर्चिल्या गेल्याने पक्षo्रेष्ठी कमालीचे संतप्त झाले असून, ‘वेळ’ आल्यावर यासंदर्भात संबंधिताना पक्षशिस्तीचे धडे द्यावे लागतील, असे सांगून नगराध्यक्षांना धीर देण्याचा प्रयत्नही झाला असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे, तर प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या दरबारातही हे वृत्त पोहोचविण्यात नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे कमी पडल्या नाहीत. 

भाजपला आश्‍वासनांचा विसर चिखलीकरांनी मोठय़ा विश्‍वासाने भाजपाच्या हाती सत्ता सोपविली आहे; मात्र सत्ता मिळाल्यानंतर भाजपाने शहरवासीयांना दिलेल्या आश्‍वासनांचा पुरता विसर पडल्याचे आज रोजी दिसून येत आहे. पालिकेत सत्तास्थापनेनंतर अद्यापही शहराच्या विकासात भरीव व दखलपात्र असे कोणतेही काम झालेले नाही. रस्ते, स्वच्छता, पाणी हे मूलभूत प्रश्न पूर्वीपेक्षा अधिक बिकट होत आहेत. ‘‘प्रमुख रस्त्यांवरील खड्डे पाहून जनता आम्हाला शिव्या घालत आहे’’, असे दस्तुरखुद्द सत्ताधारी नगरसेवकच बोलू लागले आहे. अशी एकूण परिस्थिती असताना सत्ताधार्‍यांमध्ये अंतर्गत गटबाजीला आलेले उधान पाहता, शहराला ‘अच्छे दिन’ येणार कधी? हा सवाल मात्र अनुत्तरीतच आहे.