लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरात भंगार जमा करणाऱ्या मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा यशस्वी उपक्रम दिव्या फाउंडेशनने राबविला आहे. मुलाला शिक्षणासाठी मदत करून त्याला शाळेत पोहचविल्याने त्याच्या चेहºयावर एक वेगवळेच समाधान पाहावयास मिळाले.शाळेत जाण्याच्या वयात रस्त्यावर भंगार जमा करणारी मुले आजही अनेक भागात दिसून येतात. येथील शासकीय विश्रामगृह परिसरात प्लास्टिक बॉटल व भंगार जमा करणारा मुलगा दिव्या फाऊंडेशनचे अशोक काकडे यांना दिसून आला. त्यांनी त्या चिमुकल्याची विचारपूस केली. मुलगा स्टेडियम परिसरात राहतो आई-वडिलांसोबत राहत असल्याची तिच्या बोलण्यातून समोर आले. तेंव्हा दिव्या फाऊंडेशनच्यावतीने त्या मुलाला नवीन गणवेश व शाळेसाठी लागणारे विविध साहित्य, पुस्तके खरेदी करून दिली. तसेच येथील स्वामी विवेकानंद विद्यालयमध्ये इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश देण्यात आला. दिव्या फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे व सदस्यांनी आता पर्यंत दोन हजारच्यावर अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली आहे. या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महत्त्वाचा आधार मिळाला आहे.(प्रतिनिधी)
शिक्षणापासून वंचित मुलाला आणले शैक्षणिक प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 3:27 PM