माेताळा तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन
माेताळा : तालुक्यात गत काही दिवसापासून रेतीचे अवैध उत्खनन जाेरात सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
वंचित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्या
लाेणार : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. पावसामुळे, पिकांचे नुकसान हाेऊन ही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभच मिळाला नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन विम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काेचिंग क्लासेसला परवानगी द्या
बुलडाणा : काेराेना नियमांचे पालन करून जिल्ह्यातील खासगी काेचिंग क्लासेसला परवानगी देण्याची मागणी काेचिंग क्लासेस असाेसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पहिल्याच पावसाची रस्त्याची दुरवस्था
मेहकर : मान्सूनच्या पहिल्याच पावसात मेहकर तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही.त्यामुळे, अपघात हाेत असल्याचे चित्र आहे.
अंतर्गत रस्ते बांधण्याची मागणी
बुलडाणा : शहराला लागूनच असलेल्या सुंदरखेड परिसरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिखल हाेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़
टाकरखेड येथे खरीप पूर्व प्रशिक्षण
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा कापूस मूल्य साखळी विकास उप प्रकल्प स्मार्ट - कॉटन अंतर्गत खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षण नुकतेच तालुक्यातील टाकरखेड भागिले येथे पार पडले. या प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २६ गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी टाकरखेड भागिले येथील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
शाळांकडून सक्तीने फी वसुली
सुलतानपूर : काेराेनामुळे शाळा ऑनलाईन सुरू हाेत्या़ तरीही अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पूर्ण फी पालकांकडून वसूल करणे सुरू केले आहे़ अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़
बंदी असतानाही कॅरिबॅगचा वापर सुरूच
बुलडाणा : शहरात ५० मायक्राॅन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पन्नीवर बंदी आहे. तरीही सर्रास या प्लास्टिक पन्नी शहरात वापरल्या जात आहेत. पर्यावरणासाठी हानिकारक प्लास्टिकवर चार वर्षांपासून बंदी असताना त्याची निर्मिती अन् विक्री होत आहे.
१०० पाेलिसांची काेराेना रॅपिड चाचणी
बुलडाणा : काेराेना काळात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या १०० पाेलिसांची काेराेना रॅपिड टेस्ट साेमवारी करण्यात आली़ यामध्ये एकही पाॅझिटिव्ह आले नाही़ गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे़
ग्रामीण भागात बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा
बुलडाणा : जिल्ह्यात ग्रामीण भागात साेयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे़ आधीच खतांच्या किमती वाढलेल्या असताना बियाण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे़