लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपूर : कुपोषणाचे प्रमाण कमी करणे माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून गरोदर महिला, स्तनदा माता व ७ महिने ते ६ वर्षे वयोगटांतील बालके आदींना लाभ मिळणार आहे.जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या संग्रामपूर, जळगाव जामोद या दोन तालुक्यांमध्ये भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण कमी करणे माता व बालमृत्यू रोखण्याच्या मुख्य उद्देशाने आदिवासी विभाग महिला व बालकल्याण विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आहाराचे स्वरूप या योजनेंतर्गत देण्यात येणाया एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्य, डाळ, सोया दूध साखरेसह, शेंगदाणा लाडू, अंडी अथवा केळी अथवा नाचणी, हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल गूळ वा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश आहे.