खामगाव (जि. बुलडाणा) :मोबाइलवरीलऑनलाइन ‘गेम’ दोन विद्यार्थ्यांच्या चांगलाच अंगलट आला असून दोघांच्याही पालकांची ११ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शनिवारी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.खामगावात पाणीपुरवठा विभागात कार्यरत एका व्यक्तीच्या खात्यातून दीड महिन्याच्या काळात दरराेज २९ हजार रुपये वळते झाले. मात्र, ९.५० लाखांची फसवणूक होईपर्यंत हा प्रकार लक्षातच आला नाही. तर दुसऱ्या प्रकरणात एका विद्यार्थ्याने गेम खेळत असताना वाळू कंत्राटदार असलेल्या वडिलांच्या खात्याचा ओटीपी दिला. त्यांच्याही खात्यातून दीड लाख रुपये वजा झाले.
मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, अन् पालकांना ११ लाखांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 5:39 AM