लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येत्या 14 नोव्हेंबर रोजी हिंदु संस्कृतीतील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण दिवाळी असल्याने बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. दिवाळीला घरासमोर आकाशदिवे लावण्यात येतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली असून, बाजारात मोठ्या प्रमाणात आकाश दिवे विक्रीस आले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकाशदिवे हे चिनी असल्याचे 3 नोव्हेंबर रोजी दिसून आले, देशीपध्दतीचा एकही दिवा बाजारपेठेत दिसून आला नाही. दिपावली म्हणजे दिव्यांचा सण. यादिवशी संपूर्ण परिसर दिव्यांनी सजविल्या जातात. अनेक जण आकर्षक असे आकाश दिवे घरासमोर लावतात, विघुत रोषणाई करतात. पूर्वी घरावर करण्यात येत असलेली रोषणाई मंडप व्यावसायिकांकडून घरावर करुन घ्यायचे. परंतु चायनाचे विघुत दिव्यांची सिरीज अतिशय स्वस्त मिळत असल्यने नागरिकांचा कल त्याकडे दिसून येत आहे. तसेच चायनामधून येणारे आकाश दिवे आकर्षक असल्याने नागरिक या दिव्यांनाच पसंती देत असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. स्वस्त व दुसऱ्या वषीर् सुध्दा व्यवस्थित ठेवून दिल्यास कामात पडत असल्याने चायना आकाश दिव्यांची मागणी वाढली आहे.देशी आकाश दिव्यांचा रंग हा लवकरच उडून जात असल्याने दिवाळी संपल्यानंतर ते दिवे फेकून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचेही एका ग्राहकाने सांगितले. त्यामुळे शहरात विक्रीस आलेल्या दुकानांमध्ये सर्वाधिक चायनामेड आकाश दिव्यांची भरमार दिसून येत आहे. एकीकडे चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भाषा करण्यात येत असतांना दुसरीकडे बाजारपेठेत त्याच वस्तुंची रेलचेल दिसून येत आहे. त्यामुळे चीनी वस्तूंचा निषेध निरर्थक ठरत असल्याचे दिसून येतेे.
खामगाव येथील बाजारात चिनी आकाशदिव्यांची भरमार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 4:36 PM