शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० ला नागरिकांच्या अभिप्रायाचा अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 2:24 PM

अभिप्रायात नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद ही राज्यातील पालिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्वच्छता आणि जनजागृतीसाठी महत्वाकांक्षी असलेली ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ स्पर्धा नागरिकांच्या अभिप्रायाच्या अडथळ्यात अडकल्याचे चित्र आहे. अभिप्रायात नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद ही राज्यातील पालिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, सकारात्मक प्रतिसाद वाढविण्यासाठी पालिकांमधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून राज्यातील विविध पालिकां कर्मचाऱ्यांची स्वच्छ सर्वेक्षणासाठी धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते.केंद्र शासनाने देशात स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांच्या अभिप्रायासाठी स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत ‘स्वच्छता अ‍ॅप’ हा पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे स्वच्छता मोहिमेत लोकसहभाग वाढला. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनीसुद्धा ही जबाबदारी घ्यावी.नागरिकांना शहरात कुठेही अस्वच्छता, कचरा, घाण दिसली तर नागरिकांनी त्यांच्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून त्याचे छायाचित्र काढून ‘स्वच्छता अ‍ॅप’ वर ठिकाणासह टाकायचे.जेणेकरून नगरपालिका त्यावर कारवाई करू शकेल आणि त्यातून शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. हा प्रमुख उद्देश त्यामागे होता. मात्र, स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मधील सिटीझन फिडबॅक (नागरिकांचा अभिप्राय) याघटकातंर्गत कामगिरीत राज्यातील नगर पालिकांची सुमार कामगिरी राहील्याचे दिसून येते. 

टॅग्स :khamgaonखामगावSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान