विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
जानेफळ : संचारबंदी असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. विनाकारण फिरत असलेल्यांवर पाेलिसांनी दंडात्मक कारवाई केली. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.
पशुसंवर्धन विभागाला हवे विमा कवच
बुलडाणा : काेराेना काळातही पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पशुंवर उपचार करीत आहेत. आतापर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या दाेन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याची मागणी हाेत आहे.
पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निकाली काढा
बुलडाणा : या वर्षी मान्सून लवकरच दाखल हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे १ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाची प्रकरण तातडीने मंजूर करून निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गाेठ्याला आग, हजाराे रुपयांचे नुकसान
लाेणार : तालुक्यातील पाडळी शिंदे येथील रहिवासी तेजराव शिंदे यांच्या गावाला लागून असलेल्या गट नंबर ९९ मधील शेतातील जनावरांच्या गोठ्याला १२ मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत गोठ्यातील जनावरांचा चारा, कुटार, पीव्हीसी पाइप, टिनपत्रे, ठिबक संच भक्ष्यस्थानी पडले.
चांडाेळ येथे लसीचा तुटवडा
चांडाेळ : कोरोनाला आळा घालण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांना लसीचे महत्त्व पटल्यामुळे असंख्य नागरिक लस घेण्यासाठी येथील आरोग्य केंद्रात येत आहेत, परंतु या ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परत जावे लागत आहे.
कडक निर्बंधामुळे शेतकरी संकटात
बिबी : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केेले आहेत. भाजीपाला आणि फळविक्रीही बंद करण्यात आल्याने, शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतातच शेतमाल पडून असल्याने, या मालाचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
धामणगाव बढे : परिसरातील अनेक शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खरीप हंगामास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राहेरी पुलाचा प्रश्न लागला मार्गी
सिंदखेडराजा : तालक्यातील राहेरीजवळील पुलाच्या बांधकामासाठी ९ काेटी ८५ लाख मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे लसीकरण करा
बुलडाणा : जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन, त्यांचे लसीकरण करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
लाेणार तालुक्यात माेफत धान्याचे वाटप
लाेणार : तालुक्यात मुख्यमंत्री गरीब कल्याण याेजनेंतर्गत माेफत धान्याचे वाटप करण्यात आले. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे हातावर पाेट असणाऱ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
अमडापुरात काेराेना याेद्ध्याचा सत्कार
अमडापूर : काेराेना महामारीच्या काळातही जिवाची पर्वा न करता, कर्तव्य बजावणाऱ्या काेराेना याेद्ध्याचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. प्राथमिक आराेग्य केंद्रात आयाेजित या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित हाेते.