लोणार : जगप्रसिद्ध लोणारनगरीमध्ये विकासकामाला गती मिळत आहे परंतु नबीच्या खड्ड्यासमोर जाणारा मुख्य रस्ता हा पर्यटकांसाठी मुख्य आहे़ याच रस्त्यावरून पर्यटकांची वर्दळ असते परंतु या रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ रस्त्यांवर अनेक ठिकाणी माेठे माेठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे़ रस्त्यातून मार्ग काढताना पर्यटकांना व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याठिकाणी वाहून येणारे पाणी हे पूर्णपणे सरोवराच्या आत जात आहे़ त्यामुळे सरोवराचा संशोधनाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन तत्काळ रस्ता पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा यांच्याअंतर्गत येत असल्याने उर्वरित रस्ता हा मागील एका वर्षापासून पूर्ण झाले आहे; परंतु सरोवराच्या बाजूला असलेले नबीच्या खड्ड्याजवळ माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे़ या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने पर्यटक व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ यासाठी लोणार सरोवराच्या विकास संवर्धन समितीचे सदस्य प्रा. बळिराम मापारी व प्रा. गजानन खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली आहे़
धारातीर्थ सुरू करण्याची मागणी
लोणार सराेवरातील धारातीर्थ हे पर्यटकांसाठी मुख्य पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे़ पुरातन विभागाअंतर्गत हे पर्यटनस्थळ बंद आहे़ हा धारातीर्थ सुरू करण्यात यावे तसेच जुने रेस्ट हाऊस समोरील सरोवराच्या काठावरील व्ह्यू पॉईंटवरून पर्यटकांना पाहण्याची परवानगी देण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी लोणार सरोवर विकास संवर्धन समितीचे सदस्य यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.