खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्याम घुगे हे स्वत: उपस्थित झाले आहेत. गाडी रस्त्यात उभी केल्याच्या कारणावरुन बोरी अडगाव येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यामध्ये रामेश्वर नारायण टिकार हे गंभिर जखमी झाले. तर सारंगधर श्रीराम टिकार, अच्युत टिकार व रोशन टिकार हे तिघे सुध्दा जखमी झाले. यातील रामेश्वर टिकार व रोशन टिकार यांच्यावर अकोला येथे सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गावातीलच आनंदा पुरुषोत्तम सुरवाडे या व्यक्तीने अंगावर इंडिका गाडी आणल्याने याठिकाणी दोन गटात तुफान मारहाण झाली होती. यात पाच जण जखमी झालेल्यांवर खामगाव व अकोला येथे उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटाकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून खामगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन गटात हाणामारीनंतर बोरी अडगाव बंद; जमावबंदीचे आदेश, गावात पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:19 PM
खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही.
ठळक मुद्देखामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्याम घुगे हे स्वत: उपस्थित झाले आहेत.