लोणार (बुलडाणा) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृहातीलईयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने खोलीत पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी घडली. विकास अशोक सुपेकर ( वय १७ ) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो अजीसपुर येथील रहिवासी आहे.
अजिसपुर येथील विकास अशोक सुपेकर हा महाराणा प्रताप हायस्कूलचा विद्यार्थी मागील तीन वषार्पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृहात वास्तव्यास आहे. पाच वषार्पूर्वी विकासच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. दहावीचा विद्यार्थी असलेल्या विकासने पाच पेपर दिले. शुक्रवारी त्याचा सहावा ईतिहासचा पेपर होता. सकाळी त्याने जेवणही केले नव्हते. सकाळी वस्तिगृहातील विद्यार्थ्यांना जेवनासाठी आवाज देण्याकरीता गेलेल्या कर्मच्याऱ्याला विकासच्या खोलीचा दरवाजा आतमधून बंद असल्याचे दिसले. त्याने लगेच ईतर विद्यार्थ्यांना बोलावून दरवाजा तोडला. खोलीत बघितले असता पेपरला न जाता खोलीच्या सीलिंग पंख्याला दोरिच्या सहाह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दिसून आले.
कर्मच्याऱ्यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनीघटनास्थलाकडे धाव घेऊन पंचनामा केला. विकासाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उकंडा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलिस करत आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच समाजकल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त वाट यांनी वसतिगृहाला भेट दिली.