शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

स्वच्छ भारत मिशन: आधी शौचालये, आता फाईली गहाळ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:49 PM

खामगाव : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन मधील एक घोळ निस्तरत नाही, तोच दुसरा समोर येतो. घोळांच्या या श्रृंखलेत आता नविनच मुद्दा पुढे आला आहे,  तो म्हणजे फाईलीचा.

- अनिल गवई

खामगाव : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन मधील एक घोळ निस्तरत नाही, तोच दुसरा समोर येतो. घोळांच्या या श्रृंखलेत आता नविनच मुद्दा पुढे आला आहे,  तो म्हणजे फाईलीचा. आधी शौचालये सापडत नव्हती, आता फाईली सापडत नाहीयेत. त्यामुळे आता करावे, तरी काय असा प्रश्न? या अभियानात काम करणाºया साºयांनाच पडला आहे.

 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यातील सर्वच शहरांसोबतच ग्रामीण भागातही स्वच्छ अभियानाची अंमलबजावणी करण्याचे काम शासनाने सुरु केले. हे अभियान सगळीकडेच राबविण्यात आले असले, तरी सर्वात जास्त चर्चा झाली, ती बुलडाणा जिल्ह्याची. दुर्गम आदिवासी भागातील शौचालय गायब असण्यासोबतच  आदिवासींची फसवणूक सर्वप्रथम ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली. 

दरम्यान, या अभियानाला जिल्ह़यात खूप आधीपासून सुरूवात झाली असली, तरी यात रंगत आली, ती मिशन नाईन्टी डेज पासून. नोव्हेबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान यंत्रणा धावली आणि येथूनच एकेक मजेदार किस्से घडायला सुरुवात झाली. नव्वद दिवसात जिल्हा हगणदरीमुक्त करायचा म्हटल्यावर प्रत्येकाने आपापल्या परीने शकला लढवायला सुरुवात केली. बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या ८६६ गावांमध्ये कागदी घोडे नाचले. हे करता-करता काय चुकीचे आणि काय बरोबर याचा मेळ कधी बसलाच नाही. मार्चअखेरीस १३ तालुक्यात ३ लाख ५१ हजार ९२८ शौचालयांचे बांधकाम पुर्ण झाल्याचे दाखवत जिल्हा हगणदरीमुक्त जाहीर करण्यात आला. कागदोपत्री जिल्हा हगणदरीमुक्त झाला खरा, मात्र  तांत्रिक बाबीची पुर्तता करता-करता अनेकांच्या नाकीनऊ आले. जिथे अनेक शौचालये प्रत्यक्षात बांधण्यात आलीच नाहीत, त्यांचे फोटो अपलोड कसे करायचे हा गुंता निर्माण झाला असतानाच ‘लोकमत’ने हे बिंगही चव्हाट्यावर आणले आणि इथून तक्रांरीचा ओघ सुरु झाला. खेडयापाडयात ठेकेदारांकडून बांधकाम करण्यात आल्यामुळे घसरलेला दजार्ही समोर आला. जिल्ह़यातील अनेक शौचालये सापडत नसल्याने मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारºयांनी वरिष्ठ अधिकाºयांनाही फटकारले. हा प्रकार ताजा असातनाच, आता स्वच्छ भारत मधील आणखी एक नवीन घोळ समोर आला आहे. फोटो अपलोडींग अपुर्ण असतानाच, प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या हेतूने वरिष्ठांकडून कामाच्या फाईली मागविण्यात आल्या आहेत. याचेही फोटोसारखेच होत आहे. या कामातील अनेक फाईली आजमितीला उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान