शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

गाडगे बाबा यांच्या वेशभुषेत स्वच्छता करून ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:21 PM

    बुलडाणा - संपूर्ण भारताला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहीले आहे.  ते स्वप्न प्रत्यक्षात सुद्धा उतरले स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोथळीत स्वच्छतेचा जागर..!

    बुलडाणा - संपूर्ण भारताला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहीले आहे.  ते स्वप्न प्रत्यक्षात सुद्धा उतरले स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. भारत भर 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर हा पंधरवडा स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला . या पंधरवाड्यात गावांगावात रॅली काढण्यात आल्या.  गावाची स्वच्छता, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यारी घोषवाक्ये, म्हणी त्यावर आधारित निबंध स्पर्धा, लघु नाटिका असे विविध कार्यक्रम या पंधरवाड्यामध्ये आयोतिज करण्यात आले.    भारताला स्वच्छ व सुंदर बनवण्यात बुलडाणा जिल्हासुद्धा मागे राहिला नाही.  बुलडाणा जिल्ह्यात गावा-गावात वस्ती वस्तीमध्ये हा स्वच्छतेचा नारा निनादला आणि स्वच्छ भारताची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. याचं उत्तम उदाहरण जिल्ह्यातील मोताळा या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या 9 किमीवरील कोथळी या छोट्टयाशा गावात दिसले. कोथळी गाव कमी जास्त दहा हजार लोकवस्तीचे आहे.  येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे नुकतेच गावात स्वच्छता संदेश देणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. येथील विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांनी गावात खराटा घेऊन गावातील घाणीचे साम्राज्य पार हद्दपार केले. स्वच्छता करून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश या मुलांनी दिला. गावातून रॅली तर निघाली पण या रॅलीला संपूर्ण गावाचे लक्ष वेधले ते संत गाडगे बाबांच्या वेषभूषा परिधान केलेले जनता विद्यालयातील सहा. शिक्षक प्रशांत पठ्ठे यांनी.  जणू गावकऱ्यांना असा भास होत होता की खरच संत गाडगे बाबा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आपल्या गावात आले की काय..! संत गाडगे बाबा यांनी आपले संपूर्ण जीवन स्वच्छते साठी वाहून दिले.  बाबा दिवसा हातात खराटा घेऊन गावातील घाण साफ करीत आणि रात्र झाली की कीर्तनाच्या माध्यमातून  नागरिकांच्या मनातील घाण साफ करीत असत.  ते म्हणायचे ‘अरे बाळांनो देव दगडात नाही.. तो माणसात आहे’ हे महाराज लोकांना सांगत असत. अशाच स्वच्छतेचा संदेश घेऊन  संत गाडगे बाबांची वेशभूषा परिधान केलेले श्री. पठ्ठे  यांनी खराटा हातात घेऊन अख्ख गाव स्वच्छ केले.  हे पाहून गावक-यांनाही हुरूप चढला त्यांनीही हातात खराटा घेतला व सोबत गावाला स्वछ केले.     15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या दरम्यान स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने विद्यार्थी व सर्व शिक्षक यांनी गावात फिरून गावाची स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्व जनतेला पटवून दिले. पठ्ठे यांनी संत गाडगे महाराजांची वेशभूषा धारण करून गोपाला- गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणत सगळ्यांचे लक्ष केंद्रित केले. तसेच प्रमुख चौकांमध्ये गाडगे महाराजांचे स्वच्छतेप्रती व शिक्षणाप्रती असणारे संदेश गाडगे महाराजांच्या शैलीत नागरिकांसमोर मांडले. हे नागरिकांनी लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर रॅली पोहोचली. कोथळी गावाला लागूनच असलेले इब्राहिमपूर गावातही मोठ्या प्रमाणावर स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. या ठिकाणीत संत गाडगे बाबा यांची  वेशभूषा धारण करून  शिक्षक पठ्ठे यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे गावचे सरपंच यांनी पठ्ठे यांचा सत्कार केला. इब्राहीमपूरमध्ये या रॅलीने स्वच्छतेचा गजर केला.   याप्रसंगी त्यांनी संत गाडगे महाराज यांच्या शैलीतील भाषण दिले. तसेच स्वच्छतेच्या मुद्द्यावर गावकऱ्यांचे प्रबोधन केले. श्री. पठ्ठे यांचे प्रबेाधन ऐकून नागरिक स्वच्छतेप्रती मंत्रमुग्ध झाले. या प्रेरणादायी प्रबोधनामुळे गाव स्व्च्छ ठेवण्यासाठी नागरिकांचे निश्चितच मत परिवर्तन झाले. तसेच स्वछ भारत आपल्याला घडवायचा आहे, अशी मनाशी खूनगाठ यावेळी ग्रामस्थांनी बांधली. इब्राहीमपूरमधून पुन्हा स्वच्छतेचा संदेश देत पठ्ठे यांची रॅली कोथळी गावात पोहोचली आणि शेवटी विद्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला . स्वच्छता ही सेवा या रॅलीमुळे गावात स्वच्छतेचा संदेश घुमू लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचा संदेश बिंबविल्या गेला. तरी या सर्व उपक्रमांमुळे कोथळी व परीसरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.