खामगाव (बुलडाणा): नवीन नळ कनेक्शनसाठी चारशे रुपयांची लाच स्वीकारताना नगरपालिका पाणीपुरवठा विभागातील लिपिकास बुधवारी दुपारी ४.४५ वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्याची मागणी एका नळधारकाकडे केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता, आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून नगर पालिकेतील कनिष्ठ लिपिक जाधव यांना ४00 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र आर. एस. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचित्र शिंदे, पोलिस निरीक्षक डी.एन.उराडे पो.ह.वा. गजानन भडांगे, ना.पो.कॉ.विशाल हरणे, प्रमोद धानोरकर व सैय्यद ताहेर यांनी केली.
लाच घेताना लिपिक जाळ्यात
By admin | Published: December 18, 2014 1:06 AM