लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील श्री मुक्तेश्वर आश्रमात गत ४ जानेवारीपासून सुरू असलेल्या निर्गुण पादुका महोत्सवाची रविवारी सांगता करण्यात आली. यावेळी संचारेश्वर मुक्तेश्वर भगवान यांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पध्दतीने पालन करून खामगावात निर्मुण पादुका महोत्सव साजरा करण्यात आला.
निर्गुण पादुका महोत्सवानिमित्त सोमवार ४ जानेवारीपासून मुक्तेश्वर आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात झाली होती. यामध्ये दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत सत्संग झाला. मंगळवार ५ जानेवारी रोजी ह.भ.प. विनायक महाराज फुली, बुधवारी ह.भ.प. पढरीनाथ महाराज जवळा, गुरुवारी ह.भ.प. मंगेश महाराज दाताळकर, शुक्रवार व शनिवार ह.भ.प. शिवाजी महाराज झांबरे बरफगाव यांचे प्रवचन झाले. त्यानंतर रविवार १० जानेवारी रोजी सदगुरू मुक्तेश्वर माउलीच्या श्रीविग्रहाला रुद्राभिषेक, श्री निर्गुण पादुका व प.पू. श्री महाराजांचे दर्शन, दु. १२ वाजता आरती व प्रसादानंतार सायं. ५ वाजता श्री मुक्तेश्वर माऊली व प.पू. संचारेश्वर माउलीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ११ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता गुरुमंत्राने श्री मुक्तेश्वर आश्रमात सुरू असलेल्या निर्गुण पादुका महोत्सवाची सांगता करण्यात आली.