दुसरबीड(बुलडाणा) : अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.प्रवीण लक्ष्मणराव पवार यांच्या मालकीचे हे सीमा ड्रेसेस व कापड केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. सोबतच दुकानातील अन्य साहित्याचे मोठे नुकसान केले. दुकानामधील १६ सीसी कॅमेरेही फोडले. सोबतच दुकानातील नगदी २० हजार रुपये रोख, २५ हजार रुपयांचे कापड आणि अन्य माल अशी एकूण ९० हजार रुपयांची चोरी केली आहे. दुकानात चोरी करून चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पसार झाले. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बी. एन. नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जनार्धन शेवाळे, दुय्यम ठाणेदार किशोर शेरकी, अशोक मांटे, जाकेर पठाण व त्यांचे सहकारी करीत आहेत.
कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:03 AM
दुसरबीड(बुलडाणा) : अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देदुकानाचे शटर तोडून आत प्रवेश