शेगाव, दि. २९- शेतकर्यांना वार्यावर सोडून व्यापार्यांचे हित जोपासण्याच्या आरोपावरून मागील दोन महिन्यांपासून शेगावच्या नाफेड केंद्रावर शेतकरी व अधिकारी,कर्मचार्यात खडाजंगी सुरु आहे. यात बुधवारी रात्रीच्या वेळेस व्यापार्यांच्या तुरीचे मोजमाप होत असल्याच्या कारणावरून संध्याकाळी शेतकर्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांंनी संताप व्यक्त करून गोंधळ घातला. यावेळी बाजार समितीने पोलिसांना पाचारण केले होते. खामगाव रोडवरील शेगाव बाजार समितीच्या यार्डामध्ये नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरु असून या केंद्रवर शेतकर्यांच्या मालाकडे दुर्लक्ष करून व्यापारांच्या तुरीचे मोजमाप आणि व्यापारी व बाजार समितीच्या काही पदाधिकारी व संचालकांच्या मालाला प्राधान्य दिल्या जात असल्याने या केंद्रावर मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. यात शेतकर्यांची तूर चोरी जाणे, रास्ता रोको, पोलिसात तक्रार, काटा बंद पाडणे असे प्रकार घडले आहेत. यामध्ये बुधवारी सायंकाळी आणखी भर पडली. रात्रीच्या वेळेस व्यापारांच्या मालाची मोजणी होत असल्याचा आरोप करीत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद टिकार, तालुका अध्यक्ष रविंद्र उन्हाळे, शहर अध्यक्ष अमित देशमुख यांनी नाफेड खरेदी-विक्री व बाजार समितीच्या पदाधिकारी व कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरले. केंद्रावर वजन काट्यांची संख्या वाढवावी, रात्रीच्या वेळेस मालाची आवक बंद करावी व रात्रीच्या वेळेस होणारे मोजमाप बंद करण्याचा इशारा यावेळी दिला. मनसैनिकांचे रौद्र रूप पाहता यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
शेगावच्या नाफेड केंद्रावर गोंधळ
By admin | Published: March 30, 2017 2:23 AM