लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जलशक्ती मंत्रालयातंर्गत महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दहा हजार किलो प्लॉस्टिक कचºयाचे संकलन करण्यात आले. दरम्यान, या महाश्रमदान उपक्रमात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास एक लाख नागरिक सहभागी झाले असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, महाविद्यालयीन युवकांसह ग्रामीण भागातील नागरिक ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत असलेल्या महा श्रमदान मोहिमेत सहभागी झाले होते. यामध्ये हा दहा हजार किलो प्लास्किचा कचरा गोळा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आॅक्टोबर रोजी हे महा श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. निवडक ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनचेही उद्घाटन करण्यात येवून जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:54 PM